केळी घरी आणली की पुढच्या दोन दिवसांतच ती काळी पडून खराब व्हायला लागते.
असं होऊ नये आणि केळी जास्तीतजास्त दिवस फ्रेश राहावी म्हणून हे काही उपाय करून पाहा...
केळी खूप उष्ण जागी ठेवू नका. केळी नेहमी थंड जागी ठेवावी.
केळी जर कुठे लटकावून ठेवली तर ती जास्त दिवस फ्रेश राहाते.
केळीच्या देठाचा भाग ॲल्युमिनियम फॉईलने गुंडाळून ठेवला तर केळी जास्त दिवस टिकते.
जे केळ थोडंसं जरी खराब झालेलं दिसेल ते केळ लगेचच बाजुला काढून ठेवा.