पावसाळ्यात कपडे वास न येता सुकवायचे ? वाचा या १० सुपर टिप्स...

पावसात कपडे सुकवण्यासाठी घरगुती  उपाय तुमच्यासाठीच...

  लवकर वाळवण्यासाठी ओले कपडे एकावर एक ठेवू नका. एकमेकांपासून थोडे अंतर ठेवा, ज्यामुळे हवा खेळती राहते आणि कपडे लवकर वाळतात.

 खिडक्या आणि पंखे सुरू ठेवा हवा खेळती ठेवण्यासाठी पंखा व खिडक्या उघड्या ठेवा.
गरज वाटल्यास एग्झॉस्ट फॅन वापरा.

डिह्युमिडिफायर वापरा डिह्युमिडिफायर घरातील आर्द्रता कमी करून दुर्गंधी आणि बुरशी टाळतो.
हे विशेषतः लहान फ्लॅट्ससाठी उपयुक्त आहे.

कपडे धुण्याच्या शेवटच्या पाण्यात थोडा व्हिनेगर टाका. यामुळे बॅक्टेरिया मरतात आणि वास कमी होतो.

 बेकिंग सोडाचा हा नैसर्गिक वासनाशक कपड्यांवर येणारा वास कमी करण्यासाठी धुताना थोडासा बेकिंग सोडा टाका.

गरम पाण्यात धुण्याने बॅक्टेरिया मरण्यास मदत होते. पण हे फक्त योग्य फॅब्रिकसाठी वापरा.

सुगंधी फॅब्रिक स्प्रे वापरा
 ओले कपडे वाळवताना त्यावर सौम्य सुगंधी फॅब्रिक स्प्रे शिंपडा, त्यामुळे वास राहत नाही.

 ही घ्या काळजी...
 घरात सुकवताना कपड्यांचा ओलसर वास टाळण्यासाठी सुगंधी मेणबत्त्या किंवा अगरबत्ती वापरा

 जास्त वेळ ओले कपडे वॉशिंग मशीनमध्ये ठेवू नका. मशीनमध्ये ठेवले तर दुर्गंधी वाढते. लगेच  सुकवायला टाका

Click Here