सकाळी उपाशीपोटी पाणी पिणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं.
पण ते किती प्रमाणात प्यावं याविषयी अनेकांच्या मनात संभ्रम आहे.
कोणी सकाळीच भरपूर पाणी प्यावं असा सल्ला देतात तर कोणी १ ग्लास पाणी पुरेसं आहे असं सांगतात.
आयुर्वेद तज्ज्ञ आचार्य बालकृष्ण सांगतात की सकाळी उपाशीपोटी तुम्हाला सहज जाईल एवढंच पाणी प्या...
शरीराची गरज ओळखून योग्य तेवढंच पाणी प्यायला हवं. असं केल्याने पचनक्रिया अधिक चांगली होते.
तर गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्याने दिवसभर पोट जड झाल्यासारखं वाटतं.
आपापल्या शरीराच्या गरजेनुसार सकाळी उपाशीपोटी १ ते ३ ग्लास पाणी पिणं योग्य मानलं जातं.