मेथीची भाजी कडवट होणार नाही, ६ टिप्स 

मेथीची भाजी अजिबात कडू होणार नाही. पाहा कशी करावी. 

मेथी निवडताना कोवळी आणि ताजी पाने घ्या. जुनी मेथी जास्त कडू लागते.

मेथी चिरल्यानंतर थोडे मीठ लावून १० मिनिटे ठेवली तर कडूपणा कमी होतो.

भाजी करताना कांदा आणि लसूण जास्त वापरल्यास चव छान लागते.

शेंगदाण्याचे कूट किंवा बेसन घातल्याने मेथीची चव संतुलित होते.

मेथीत थोडासा गूळ घातल्यास कडवटपणा कमी जाणवतो. बटाटा किंवा मटार घालून भाजी केली तर मुलांनाही आवडते.

मेथी खूप वेळ शिजवू नका. जास्त शिजवल्यास चव बदलते. तसेच सतत ढवळणे टाळा.

तुपाची किंवा शेंगदाणा तेलाची फोडणी दिल्यास भाजी अधिक रुचकर लागते. 

Click Here