मकर संक्रांतीच्या सणाचे आणि काळ्या साडीचे एक खास समीकरण आहे.
संक्रांतीचा सण हा हिवाळ्यात येतो.त्यामुळे थंडीच्या दिवसांत शरीरात उबदारपणा टिकून राहण्यासाठी काळी साडी नेसण्याची परंपरा आहे.
हिंदू धर्मात सामान्यतः शुभ कार्याला काळा रंग टाळला जातो, मात्र मकर संक्रांत हा असा एकमेव सण आहे ज्या दिवशी आवर्जून काळी वस्त्रे परिधान केली जातात.
काळी साडी सौंदर्यात अधिक भर घालते. त्यावर जेव्हा पिवळी किंवा लाल काठ-पदर असतात, तेव्हा ती अधिक उठून दिसते
काळ्या साडीवर पांढऱ्या हलव्याचे दागिने किंवा मोत्यांचे दागिने खूप सुंदर दिसतात, ज्यामुळे एक पारंपारिक 'लूक' तयार होतो.
संक्रांतीला 'वाण' लुटण्यासाठी किंवा बोरन्हाण समारंभासाठी काळी साडी नेसणे अत्यंत शुभ आणि प्रतिष्ठीत मानले जाते.
सध्या बाजारात पैठणी, चंदेरी, सिल्क किंवा कॉटनमध्ये अनेक आकर्षक काळ्या साड्या उपलब्ध आहेत.
काळ्या साडीमध्ये फोटो खूप छान येतात, त्यामुळे सणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.