पचन सुधारते भिजवल्यामुळे बदामातील पोषक तत्वे शरीराला चांगली मिळतात आणि पचन सुधारते. मनुकांमध्ये फायबर असल्याने बद्धकोष्ठता कमी होते.
ऍसिडिटी कमी होते भिजवलेले बदाम आणि मनुके ऍसिडिटीची समस्या कमी करण्यास मदत करतात.
ऊर्जा वाढवते बदाम आणि मनुके ऊर्जा वाढवण्यासाठी ओळखले जातात, ज्यामुळे दिवसभर उत्साही वाटते.
रोगप्रतिकारशक्ती वाढवते भिजवलेले बदाम आणि मनुके रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहेत, कारण त्यात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात काळ्या मनुकांमध्ये रेझवेराट्रोल नावाचे अँटीऑक्सिडंट असते, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
हृदयासाठी चांगले बदाम आणि मनुके दोन्ही हृदयासाठी चांगले मानले जातात, कारण ते कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात.
वजन कमी करण्यास मदत भिजवलेले मनुके कॅल्शियम आणि बोरॉनने समृद्ध असतात, जे मजबूत आणि निरोगी हाडे राखण्यास मदत करतात आणि वजन कमी करण्यासही मदत करतात.
झोपेची गुणवत्ता सुधारते मनुकांमध्ये मेलाटोनिन असते, जे झोपेचे नियमन करणारे हार्मोन आहे, त्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते.
हाय ब्लड प्रेशरसाठी फायदेशीर उच्च कोलेस्टेरॉल किंवा उच्च ट्रायग्लिसराइड पातळी असलेल्या लोकांसाठी आणि हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी देखील फायदेशीर
भिजवण्याची पद्धत रात्री २, ४ बदाम आणि ५-१० काळे मनुके पाण्यात भिजत घाला. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी ते पाणी पिऊन बदाम आणि मनुके खा