या 10 गोष्टी सांगतील तुमचा पार्टनर खरंच प्रेमात आहे की नाही...
वारंवार संपर्क फक्त तुम्हीच साधता का?तुम्ही सतत मेसेज/कॉल करत असता आणि हवा तसा प्रतिसाद मिळत नसेल तर हे एकतर्फी प्रेमाचे लक्षण असू शकते.
भेटण्यासाठी तो/ती टाळाटाळ करते का?तुम्हीच सतत भेटीसाठी पुढाकार घेत आहात, समोरचा वेळ देत नसेल तर नात्यात दूरावा आहे.
स्वतःची चूक न मानणे नेहमी तुम्हीच माफी मागत असाल, समोरची व्यक्ती स्वतःची चूक मानत नसेल तर नात्यात असमतोल आहे.
पैशांवरून वाद किंवा मागण्यामहागड्या गोष्टींची डिमांड किंवा पैशांवरून भांडणे होत असतील तर चर्चा आवश्यक आहे.
नात्यात एकतर्फी प्रयत्नतुम्हीच नेहमी नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करत असाल, तर ते एकतर्फी प्रेमाचे लक्षण आहे.
भावनांकडे दुर्लक्षतुमच्या भावना,मतांचा आदर केला जात नाही का? दुखावल्यावर समजून घेतलं जात नाही का? हे संकेत धोका देतात.
भविष्यासंदर्भातील उडवाउडवीभविष्यासंबंधी चर्चा पुढे ढकलली जातेय का? तर नात्यात गंभीरता नाही.
लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये प्रयत्न फक्त तुमचेच?सतत तुम्हीच भेटी किंवा सरप्राईज प्लान करत असाल,तर हे नातं एकतर्फी आहे हे ओळखा.
खरा प्रेमाचा संकेतजो तुमच्या आनंदात आनंद मानतो,तडजोड करतो,तो खरा प्रेमात आहे.