नवरात्रीत नेसण्यासाठी तुमच्याकडे हव्याच या ९ प्रकारच्या साड्या...

नवरात्रीचे ९ दिवस वेगवेगळे कार्यक्रम होत असतात. त्यानिमित्ताने तुमच्याकडे या काही खास साड्या असायलाच हव्या...

कांजीवरम साड्यांची श्रीमंतीच वेगळी. त्यामुळे नऊरात्रीत एकदा तरी कांजीवरम साडी नक्की नेसा.

बनारसी साडीचा थाट आणि रुबाब एखाद्यावेळी तरी अंगावर मिरवायलाच हवा...

पटोला सिल्क साडीही खूप ट्रेण्डिंग असून नवरात्रीमध्ये तर तिची विशेष मागणी असते.

अशी एखादी मिरर वर्क असणारी साडी आपले सौंदर्य नक्कीच खुलवून टाकते.

सेक्विन साड्यांची क्रेझही अजूनही टिकून आहे. त्यामुळे सेक्विन साडीही तुम्ही नवरात्रीमध्ये नक्कीच नेसू शकता.

अशा पद्धतीची डिझायनर लूक देणारी साडी असेल तर ती दांडिया खेळायलाही घालू शकता. 

टाय- डाय पद्धतीची लेहरिया साडी तर प्रत्येक वयोगटाच्या महिलांना छानच दिसते. 

आकर्षक रंगाची शिफॉन साडी आणि त्यावर डिझायनर ब्लाऊज हा लूक तर ऑल टाईम हिट आहे. 

नवरात्रीमधल्या वेगवेगळ्या पूजा आणि हळदी- कुंकूसारख्या कार्यक्रमांना अशा काठपदराच्या साड्या खूप शोभून दिसतात. 

Click Here