चहा-कॉफीऐवजी प्या ही पौष्टिक पेये. करायलाही सोपी आणि पोटासाठी हलकी. पचनासाठी उत्तम.
वजन कमी करायचे म्हणजे दिवसाची सुरवात चहा कॉफीने करणे नक्कीच टाळावे लागते. पण मग त्याऐवजी काहीच पिता येणार नाही का? तर तसे नसून अनेक पौष्टिक पर्याय आहे.
रोज सकाळी जिऱ्याचा काढा पिणे आरोग्यासाठी फार फायद्याचे ठरेल. पचनाची क्रिया अगदी सुरळीत राहील.
गरम पाणी आणि लिंबाचा रस हे मिश्रण वजन कमी करण्यासाठी फायद्याचे ठरते. पोटाचे आजारही बरे होतात.
ग्रीन टी पिऊन अनेकांनी वजन कमी केले आहे. मात्र सातत्य महत्त्वाचे ठरते. हा चहा जरा कडवट असला तर आरोग्यासाठी फार चांगला असतो.
प्लेन ब्लॅक कॉफी पिणे अनेकांना पसंत आहे. कडवट लागते म्हणून पित नसाल तर नक्की प्या. साखर-दूध घातल्यावर कॉफीचे पोषण घटक नाश पावतात.
आल्याचे पाणी प्या. आल्यामुळे पचन सुधारते आणि ऊर्जाही मिळते. गरम पाण्यात आले उकळून त्यात मध घाला आणि प्या. चवही छान असते.
अॅण्टी ऑक्सिडंट्सने परिपूर्ण असा हर्बल टी नक्कीच प्या. चवीलाही छान असतो आणि घशासाठीही फायद्याचा ठरतो. तसेच वजन कमी करण्यासाठी मदत होते.