७ सवयी लावून घ्या, नव्या वर्षात राहाल फिट आणि हेल्दी

२०२६ हे नवं वर्ष तुमच्यासाठी आरोग्यदायी होण्यासाठी काही सवयी स्वत:ला लावून घ्या..

रोज अर्ध्या तासाचा वेळ स्वत:साठी राखून ठेवा आणि त्यामध्ये व्यायाम, वॉकिंग असं काही ना काही करा.

रोज पुरेसं पाणी प्या. शरीर हायड्रेटेड राहिल्यास आरोग्याच्या कित्येक समस्या कमी होतात.

काही ना काही नविन सतत शिकत राहा. यामुळे तुम्ही कायम उत्साही, आनंदी राहता. मेंदूही फ्रेश, तल्लख राहण्यास मदत होते.

कमावलेल्या पैशांचा व्यवस्थित हिशोब ठेवा आणि बचत करण्याची सवय लावून घ्या.

न आवडत्या किंवा स्वत:ला न झेपणाऱ्या गरजेपेक्षा जास्त गोष्टी स्वत:वर ओढवून घेण्यापेक्षा नाही म्हणायला शिका. 

झोपण्यापुर्वी किमान १ तास तरी मोबाईलपासून दूर राहा आणि त्यावेळेत काहीतरी चांगलं वाचा. 

स्वत:ची स्वत:शीच तुलना करा आणि प्रत्येक गोष्टीत मागच्यापेक्षा यावेळी काहीतरी अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न करा. 

Click Here