उन्हाळ्यात साडी नेसणार असाल तर पुढील साड्या तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहेत.
कॉटनची साडी उन्हाळ्यात अगदी हलकीफुलकी असते. शिवाय कॅरी करायलाही सोपी जाते.
लीनन साडी देखील उन्हाळ्यासाठी बेस्ट आहे. वजनाने हलकी आणि अंगावर अगदी चापुनचोपून बसणारी.
स्लिव्ह्जलेस ब्लाऊज आणि मोजके दागिने अशा थाटात उन्हाळ्यात साडी नेसा. छान दिसाल.
उन्हाळ्यासाठी साडी निवडताना साडीच्या रंगाकडे विशेष लक्ष द्या. फिक्या, फ्रेश रंगाच्या साड्या या दिवसांत चांगल्या वाटतात.
ऑर्गेंझा साडीही उन्हाळ्यात चांगली आहे. कारण ती लाईटवेट असल्याने कॅरी करायला त्रास होत नाही.
फ्लॉवर प्रिंट किंवा बारीक प्रिंटच्या शिफॉन साड्याही उन्हाळ्यासाठी उत्तम आहेत.