समोश्याचे ६ चमचमीत प्रकार, तुम्ही कोणते खाल्ले आहेत?
या प्रकारचे समोसे कधी खाल्ले का? पाहा कोणते प्रकार आहेत.
समोसा भारतात फार लोकप्रिय असा पदार्थ आहे. गरमागरम समोसा आणि चहा नाश्त्याला मिळाला तर मज्जाच येते.
समोसा फक्त बटाट्याचे सारण भरलेलाच केला जातो असे नाही. त्यातही प्रकरा आहेत. विविध भागात विविध प्रकार प्रसिद्ध आहेत.
पट्टी समोसा हा प्रकार एकदम कुरकुरीत असतो. करायला जरा कठीण आहे. सारण कमी असते मात्र चवीला एकदम मस्त असतो.
आजकाल एक प्रकार जागोजागी मिळतो तो म्हणजे चायनीज समोसा. मिठाईवाल्याकडे ठेवलेला असतोच. चवीला साध्या समोस्यापेक्षा एकदम वेगळा असतो. त्यात नूडल्सही भरल्या जातात.
मिनी समोसा तर सगळ्यांनी खाल्लाच असेल. सुके सारण भरून केलेला हा समोस बरेच दिवस टिकतो. चवीला सुक्या कचोरी सारखाच असतो.
समोसा चाट तर तुम्ही नक्कीच खाल्ले असेल. एकदम मस्त पदार्थ आहे. चाटचे मसाले आणि पाणी समोस्यासोबत एकदम मस्त लागते.
लग्नसमारंभात स्टार्टरमधे पनीर समोसा मिळतो. आकाराला जरा लहान असतो. आतमधे भरपूर पनीर असते. विविध मसाले असतात.
चीज कॉर्न समोसा कॅफे तसेच हॉटेल्समधे मिळतो. चीज आणि मक्याचे गोड दाणे मसाल्यांमधे मस्त मिक्स केलेले असते.