नवरात्रीचा उपवास करत असाल तर बटाट्याचे हे काही पदार्थ नक्कीच खाऊन पाहा..
बटाटा फ्राय हा पदार्थ तुम्ही करू शकता. तुपामध्ये बटाटा चांगला परतून घ्या. त्यामध्ये हिरव्या मिरच्या, जिरे, मीठ घालून लिंबू पिळा. बटाटा चवदार होईल.
बटाटा उकडून घ्या. कढईमध्ये तुपाची फोडणी करून घ्या. त्यात जिरे घाला आणि बटाटे फ्राय करून घ्या.
फोडणीमध्ये दही घालून त्यात बटाटा शिजवून घ्या. चवीसाठी हिरव्या मिरच्या, मीठ, दाण्याचा कूट घाला. हा दही बटाटा खूप चवदार लागतो.
उपवासाला तुम्ही आलू टिक्कीही करू शकता. यासाठी बटाटा उकडून तो साबुदाण्याच्या पिठामध्ये घोळून घ्या. चवीनुसार यात तिखट, मीठ घाला. या टिक्की छान तळून घ्या. अतिशय खमंग लागतात.
बटाट्याचा हलवा हा देखील एक खूप चांगला पदार्थ आहे. लहान मुलांसकट सगळ्यांनाच आवडेल.
बटाट्याच्या हलव्याप्रमाणेच बटाट्याची खीरसुद्धा तुम्ही करू शकता.