गोडाचे जेवण केल्यावर यातील पदार्थ नक्की असावेत. चव नियंत्रित ठेवण्यासाठी फायद्याचे.
भारतात घरोघरी सतत गोडाचे पदार्थ केले जातात. मात्र जास्त गोड खाल्यावर काहीतरी तिखट खावेसे वाटतेच.
गोडासोबत सगळेच पदार्थ छान लागत नाहीत. मात्र काही पदार्थ असे असतात, जे गोड पदार्थ खाल्यानंतर नक्की खावे. चव जास्त छान लागते.
एखादा गोड पदार्थ कराल त्या दिवशी कढी नक्की करा. करायला अगदी सोपी असते आणि चवीला एकदम मस्त.
पुरणपोळी, सांज्याची पोळी केल्यावर त्या सोबत कटाची आमटी नक्की करा. ही आमटी गोड पदार्थांसोबत एकदम मस्त कॉम्बिनेशन आहे.
पोह्याचा चिवडा लाडू किंवा शिरा असे गोड पदार्थ केल्यावर खायचा. एकदम मस्त लागतो. तोंडाला चव येते.
कोकणात गोडाचे जेवण केल्यावर गरम मसाला आमटी करण्याची पद्धत आहे. पोटभर गोड पदार्थ खायचे आणि शेवटी मस्त गरम मसाला आमटी भात.
भाजणीची चकली अगदी चाहासोबतही मस्त लागते. इतरही सगळ्या गोड पदार्थांसोबत खायला मस्त लागते.
तिखट बुंदी जशी दह्यातून मस्त लागते तशीच गोड पदार्थांसोबतही छान लागते. गोडाचे जेवण असल्यावर ताटात थोडी तिखट बुंदी घ्यायची.