काही लोकांचे स्वभावच एवढे विचित्र असतात की त्यांच्या पार्टनरला त्याचा खूप त्रास होतो..
गोष्टी खटकायला लागल्या की वाद होतात आणि मग ब्रेकअप.. हे सगळं टाळायचं असेल पुढील स्वभावाच्या व्यक्तीसोबत राहणं टाळा..
जी माणसं रागारागात जोरात ओरडून बोलतात. समोर काेण आहे त्याचंही भान ठेवत नाहीत..
आपल्या पार्टनरची नेहमी त्यांच्या एक्ससोबत तुलना करतात आणि त्यावरून सतत ऐकवतात.
त्यांच्यासोबत घडणाऱ्या कोणत्याही चुकीच्या गोष्टीसाठी त्यांच्या पार्टनरलाच दोषी धरतात...
रिलेशनशिपमध्ये असतानाही दुसऱ्या स्त्रीसोबत किंवा पुरुषासोबत खूप चॅटिंग, फ्लर्टिंग करतात.
तुम्हाला अजिबात वेळ न देणे, जास्तीतजास्त वेळ ऑफिसमध्ये किंवा इतर ठिकाणी बिझी असणे..
दिवसदिवस अबोला धरणे, एकमेकांशी बोलून अडचणीसोडविण्याच्या ऐवजी दिवसेंदिवस मौन धरणे