५ पदार्थ भाजून खा, भराभर उतरेल वजन

संध्याकाळी लागलेली छोटीशी भूक भागविण्यासाठी हे पदार्थ वेटलॉस करणाऱ्यांसाठी उत्तम आहेत..

पहिला पदार्थ आहे चणे - फुटाणे. त्यांच्यामध्ये फायबर आणि प्रोटीन्स चांगल्या प्रमाणात असतात. फुटाण्यांचं चाट करूनही तुम्ही खाऊ शकता.

मखाना हे देखील एक लो कॅलरी फॅट आहे. ते पौष्टिक तर असतातच, पण वजन वाढण्याचं टेन्शनही  नसतं.

भाजलेले शेंगदाणे हा देखील एक हेल्दी पर्याय आहे. त्यातून चांगले फॅट्स आणि प्रोटीन्स मिळतात.

भाजलेल्या बदामांमधून चांगले फॅट्स, प्रोटीन्स, फायबर आणि ॲण्टीऑक्सिडंट्स चांगल्या प्रमाणात मिळतात. शिवाय बदाम खाल्ल्यानंतर बराच वेळ भूक लागत नाही. 

संध्याकाळी लागलेली छोटीशी भूक भागविण्यासाठी भाजलेली मूग डाळ हा देखील एक चांगला पर्याय आहे. 

Click Here