रोज पाणी न घालताही छान वाढतात 'ही' रोपं..

गार्डनिंगसाठी ज्यांना वेळ नसतो, पण रोपांची खूप हौस असते अशा लोकांसाठी परफेक्ट ठरणारी काही रोपं...

रोपांची काळजी घ्यायला त्यांना रोजच्या रोज पाणी द्यायला वेळ नसेल तर ही काही रोपं तुम्ही लावू शकता..

स्नेक प्लांटला ३ ते ४ दिवसांतून एकदा पाणी लागतं. शिवाय ते घराबाहेर किंवा घराच्या आतही ठेवू शकता.

नेहमीच हिरवंगार राहणारं रोप म्हणजे स्पायडर प्लांट. याला ३ ते ४ दिवसांतून अगदी थोडं पाणी लागतं.

पीस लीली या रोपालाही आठवड्यातून एकदा पाणी घालावं लागतं. घरात ठेवण्यासाठी हे रोप उत्तम आहे.

रबर प्लांटलाही रोज पाणी घालण्याची आणि त्याच्याकडे खूप लक्ष देण्याची गरज नसते.

एरिका पाम दिसायला खूप छान असतं, शिवाय लो मेंटेनन्स प्लांट म्हणूनच ते ओळखलं जातं.

झेड झेड प्लांटला तुम्ही २ ते ३ दिवसांतून एकदा पाणी दिलं तरी चालतं. ते छान वाढतं आणि हिरवंगार राहातं. 

Click Here