पनीर चवीला छान आणि पौष्टिकही. पाहा पनीरचे विविध पदार्थ. फक्त भाजीत नाही असेही खा.
पनीर हा पदार्थ फक्त पौष्टिकच नाही तर फार चविष्टही असतो. पनीरच्या रेसिपी आहेत. विविध प्रकारच्या भाज्या केल्या जातात.
पण पनीरची फक्त भाजीच करतात असे नाही. त्याच्या विविध रेसिपी करता येतात.
पनीरचे सॅण्डविच करता येते. चवीला एकदम मस्त असते. तसेच पौष्टिकही असते.
पनीर पराठा हा पदार्थ आजकाल फार लोकप्रिय आहे. नाश्त्यासाठी तसेच जेवणासाठीही हा पराठा करता येतो. सोबत मस्त चटणी किंवा दही घ्यायचे.
पनीर रोल किंवा पनीर फ्रॅन्की मस्त झणझणीत आणि झटपट होणारी रेसिपी आहे. मैदा, कणीक कोणतेही पीठ वापरुन करता येते.
पनीर आहारात असणे फायद्याचे ठरते. डाएटसाठी पनीरचे सॅलेड एकदम मस्त आहे. त्याची चव छान असतेच शिवाय त्यात भरपूर पोषण असते.
बेसन आणि पनीर या मिश्रणातून पनीर चिला म्हणजेच पनीरचा पोळा करता येतो. किसलेले पनीर पोळ्यावर घालायचे. त्याची चव आणि पोषण दोन्ही वाढते.
तसेच पौष्टिक नाही पण पनीरचे गोड पदार्थ केले जातात. मिठाई करताना पनीर वापरल्यावर त्याला छान घट्टपणा येतो.