पावसाळ्यात ६ पदार्थ खा, सर्दी खोकला गायब

पावसाळ्यात हे पदार्थ खाणे आरोग्यासाठी एकदम फायद्याचे. पाहा काय खाऊन सर्दी खोकला दूर ठेवता येईल.

पावसाळा म्हणजे मस्त वातावरण आणि भरपूर पाणी. तसेच पावसाळा म्हणजे आजारपणही. ताप, खोकला, सर्दी असे आजार सारखे होतात. 

आहारात काही पदार्थ असतील तर असे त्रास टाळता येतात. पावसाळा संपेपर्यंत रोज हे पदार्थ खा. 

झोपण्याआधी रोज हळदीचे दूध पिणे फार उपयुक्त ठरेल. घसा चांगला राहावा यासाठी हळद मदत करते. तसेच त्यातील सत्वांमुळे ताप वगैरे येणार नाही. 

सुंठ हा अत्यंत पौष्टिक मात्र फार कमी वापरला जाणारा पदार्थ आहे. सुंठ चहात, दुधात काही पदार्थांमध्ये घालू शकता. नक्की फायद्याचे ठरेल. 

लसूण आपण खातो मात्र त्याचे फायदे आपल्याला माहिती नसतात. सर्दी खोकला कमी करण्यासाठी लसणातील तिखटपणा फायद्याचा ठरतो. 

तुळस, गवतीचहा असे पदार्थ आहारात असावेत. काढा करुन प्या. तसेच सूप केल्यावर त्यात घाला. आरोग्यासाठी फार चांगले असतात. 

काळीमिरी, दालचिनी असे खडे मसाले आरोग्यासाठी चांगले असतात. खोकला तसेच सर्दी कमी करण्यासाठी मदत होते. 

संत्री तसेच पेरु ही फळे खा. फळे आरोग्यासाठी फार चांगली असतात तसेच पावसाळ्यात संत्री आणि पेरु खाल्याने सर्दी होत नाही. 

Click Here