भारतातले ६ गोड पदार्थ, तुम्ही आजवर खाल्ले नाहीत!

हे गोड पदार्थ म्हणजे आहाहा!! चवीला एक नंबर. तुम्हाला माहिती आहेत का? 

कुठल्या राज्यात कोणता गोड पदार्थ फार प्रसिद्ध आहे आणि मोठ्या प्रमाणावर केला जातो ते जाणून घ्या. पाहा तुम्हाला कोणता पदार्थ आवडतो ?

दिवाळीला घरोघरी आवडीने खाल्ला जाणारा अनारसा उत्तराखंडमध्ये फार लोकप्रिय आहे. पदार्थ करायची पद्धत राज्यानुसार बदलते.

निमिष एक प्रसिद्ध लखनवी मिठाई आहे. जी मस्त मलाईदार आणि हल्की असते. मावा, दूध, केसर अशा पदार्थांपासून केली जाते. 

वाराणसीमध्ये मलइयो हा पदार्थ फार लोकप्रिय आहे. दुधावरील साय फेटून ही मलाई तयार करतात. मिठाई रात्रभर ठेवावी लागते तेव्हाच तयार होते. 

तामिळनाडूची फेमस थेंगई बर्फी म्हणजे ओल्या नारळाची वडी असते. चवीला एकदम जबरदस्त असते. 

रसभारी पेढा हा पदार्थ चवीला एकदम मस्त तर असतोच शिवाय करायची पद्धतही वेगळी आहे. उत्तर भारतात हा पदार्थ केला जातो. 

कोलकाता बटर टोस्ट कधी खाल्ला का? अगदी सोपी रेसिपी आहे. गोड ब्रेड असेही म्हटले जाते. 

महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला तिळगूळाचा लाडू झारखंडमध्येही प्रसिद्ध आहे. आरोग्यासाठी हा लाडू चांगला आहे.   

Click Here