केसांची वाढ होतच नसेल तर पुढे सांगितलेले काही उपाय निश्चितच मदत करू शकतात..
कांद्याचा रस आणि मेथी दाण्यांची पेस्ट यांचा हेअरमास्क केसांना लावा. त्यातील सल्फर आणि इतर घटकांमुळे केसांची चांगली वाढ होते.
प्रोटीनयुक्त पदार्थ जास्तीतजास्त प्रमाणात खा. केस गळणं कमी होऊन त्यांची चांगली वाढ होते.
खोबरेल तेल, कॅस्टर ऑईल, रोजमेरी ऑईल यांनी केसांना नियमितपणे मालिश करा. रक्ताभिसरण चांगलं होऊन केसांची मुळं पक्की होतात.
रोज रात्री ७ ते ८ तासांची शांत झाेप घ्यायलाच हवी. यामुळे हार्मोन्स संतुलित राहून केस गळणंही कमी होतं.
केसांसाठी उपयुक्त असणारे व्हिटॅमिन ई तुमच्या आहारात योग्य प्रमाणात असायला हवे.
३ ते ४ महिन्यातून एकदा केस कापा. यामुळे स्प्लिट हेअर कमी होऊन केसांची चांगली वाढ होत जाते.