शरीरासाठी फार उपयुक्त ठरतील या बिया. पाहा कशा खाव्यात.
विविध प्रकारच्या बिया आरोग्यासाठी फार चांगल्या असतात. अशा काही बिया असतात ज्या आहारात असणे फार फायद्याचे ठरते.
भोपळ्याच्या बिया, जवसाच्या बियांसारखे सूर्यफुलाच्या बियाही खाल्या जातात. आरोग्यासाठी त्या फार गुणकारी ठरतात.
सूर्यफुलाच्या बियांमध्ये फायबर्स असतात, अॅण्टी ऑक्सिडंट्स असतात. या बिया हृदयासाठी फार औषधी असतात.
मधुमेहाचा त्रास आजकाल अनेकांना असतो. त्यांनी या बिया नक्कीच खाव्यात. रक्तातील साखरेची पातळी सुरळीत ठेवण्यासाठी मदत होते.
वजन कमी करण्यासाठी या बिया डाएटमध्ये असणे फायद्याचे ठरते. त्या अनेक प्रकारची प्रथिने असतात. चरबी कमी करण्यासाठी मदत होते.
या बिया जीवनसत्त्व 'ई'चा स्त्रोत आहेत. त्यामुळे त्वचेसाठी फार चांगल्या असतात.
महिलांनी या बिया खायला हव्यात. PMS सारखे त्रास कमी करण्यासाठी मदत होते. फार उपयुक्त ठरतात.