हे गोडसर चविष्ट फळ आहे फार फायद्याचे. पाहा पेर खाण्याचे आरोग्यदायी फायदे.
पेर हे एक फार चविष्ट फळ आहे. इतर फळांएवढे लोकप्रिय नसले तरी ते आरोग्यासाठी फार फायद्याचे असते. पेर नक्कीच खायला हवे.
पेर खाल्याने पचनक्रिया सुधारते. यात फायबर असतात. त्यामुळे बद्धकोष्टता , अपचन होत नाही. आतड्याचे आरोग्य सुधारते.
शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते. या फळात जीवनसत्त्व 'सी' असते. शरीरासाठी फार उपयुक्त ठरते.
पेर डाएटमध्ये असावे. वजन कमी करण्यासाठी हे फळ फार उपयुक्त ठरते. त्यात कॅलरिज फार कमी असतात.
तुम्हाला पित्ताचा त्रास होतो का? हे फळ खा. पित्त आटोक्यात राहते आणि पोटाला गारवाही मिळतो. मळमळत नाही.
हृदयासाठीही पेर फार उपयुक्त असते. काहींच्या छातीत सतत जळजळते. ही जळजळ कमी करण्यासाठी पेर खाणे उपयुक्त ठरते.
शिवाय चवीला हे फळ मस्तच असते. अगदी गोड असते तसेच रसाळ असते. त्यामुळे लहान मुलांनाही द्या. त्यांनाही आवडेल.