महिलांकडे असायला हवेत हे खास रंग. खास सावळ्या रंगासाठी सुंदर रंग.
भारतीय महिलांची त्वचा ही फार वेगळी आणि सुंदर आहे. त्वचेचा रंग बदलण्यासाठी काहीच करायची गरज नाही. जसे आहात तसेच सुंदर आहात.
भारतीय त्वचेवर काही रंग अगदी सुंदर दिसतात. एकदम खुलून दिसतात. इंडियन डस्की स्कीन असलेल्यांनी असे कपडे नक्कीच वापरावे.
टिपिकल राणी कलरची साडी, ड्रेस, कुर्ता सारेच अगदी सुंदर दिसते.
बॉटल ग्रीन रंगाचे कपडे भारतीय डस्की त्वचेवर अगदी उठून दिसतात.
जांभळा रंग सगळ्यांनाच छान दिसतो. त्यातही अनेक शेड्स उपलब्ध आहेत.
गडद निळा रंग डस्की त्वचा असणाऱ्यांनी नक्कीच वापरुन पाहावा.
लाल रंग विसरुन कसं चालेल? गडद लाल रंग त्वचेवर छान खुलून दिसतो.
केशरी रंग छटाही डस्की त्वचेवर अगदी सुंदर दिसतात. नक्की वापरा.