पन्नाशीतही फिट आणि हॉट दिसणाऱ्या ६ अभिनेत्री

आरोग्याची छान काळजी घेतल्यावर ट्रिटमेंट्स घ्याव्या लागत नाहीत. हे विधान सिद्ध करणाऱ्या अभिनेत्री. 

म्हातारे दिसू नये म्हणून महागड्या ट्रिटमेंट्स घेणाऱ्या अभिनेत्रींप्रमाणेच अशाही काही अभिनेत्री आहेत ज्यांनी फक्त चांगला आहार आणि व्यायामाच्या जोरावर स्वतःला सुंदर ठेवले आहे. 

मराठी कलाकारांमध्ये जोश कायम भरपूर असतोच. या ६ अभिनेत्री साठी आली तरी नृत्य करतात, अभिनय करतात आणि जिम देखील करतात. 

नीना कुलकर्णी आजही चित्रपट, नाटक, मालिकांमध्ये सहज काम करु शकतात. कारण त्यांनी तसे आरोग्य राखले आहे. त्या फिटनेसकडे कायम लक्ष देतात. त्यांचे वय ६९ वर्षे आहे. 

निवेदिता सराफ, कायम हसतमुख दिसणारी एक अभिनेत्री आहेत. वयाच्या साठाव्या वर्षीही फार कार्यशील आहेत आणि दिसायलाही गोड आहेत. 

किशोरी शहाणे फक्त उत्तम अभिनेत्रीच नाही तर नृत्यांगनाही आहेत. वयाच्या ५६ व्या वर्षीही त्या सुंदर नृत्य करु शकतात. 

वयाच्या पन्नाशीत ऐश्वर्या नारकर अगदी सुंदर आणि फिट दिसतात. इंस्टाग्रामवर त्यांचे डान्स व्हिडिओ फार व्हायरल होतात. 

नीलम कोठारी ५५ वर्षाची असून आजही योगासने, जिम आणि फिटनेसमध्ये पारंगत आहे. आहार आणि व्यायामाच्या जोरावर नीलम आजही सुंदर दिसते. 

वयाच्या ५७ व्या वर्षी वर्षा उसगावकरमध्ये कमालीची एनर्जी आहे. डान्स, अभिनय आणि इतरही गोष्टींमध्ये त्या पारंगत आहेत. 

Click Here