गरमागरम चहा प्या. रोज करा वेगळा प्रकार. पावसात चहा तर हवाच.
भारतीयांसाठी चहा म्हणजे अगदी जिव्हाळ्याचाच विषय. दिवसाची सुरवात आणि संध्याकाळची वेळ चहाशिवाय अपूर्णच.
चहा करायची पद्धत मात्र वेगवेगळी असते. सगळ्यांनाच सारखा चहा आवडत नाही. चहाचे ५ प्रकार भारतात फार लोकप्रिय आहेत.
साधा चहा जो आपण रोज पितो. त्यात आलं, वेलची असे पदार्थ घालून चव वाढवता येते.
तसेच तुळस आणि सुके मसाले घालून छान फक्कड असा मसाला चहा केला जातो. घशासाठी औषधच आहे.
कोरा चहा गावात जास्त प्यायला जातो. ज्याला ब्लॅक टी असेही म्हटले जाते. चहापूड कमी घालायची.
लेमन टी तर फार लोकप्रिय आहे. तुळस आणि आलं घालून चहा करायचा भरपूर लिंबाचा रस घालायचा.
फक्त दुधाचा चहा प्यायला आहे का ? ज्याला कडक स्पेशल असे म्हटले जाते. दुधाचा चहा चवीला वेगळा लागतो.