वजन वाढतं म्हणून हल्ली अनेकजण गव्हाच्या पिठाच्या पोळ्या खाणं टाळतात.
म्हणूनच पुढे सांगितलेल्या काही पोळ्या किंवा भाकऱ्या वेटलॉस करणाऱ्यांसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतात.
त्यापैकी पहिली आहे ज्वारीची भाकरी. ज्वारीची भाकरी ग्लुटेन फ्री असते. शिवाय त्यात भरपूर प्रमाणात फायबर आणि लोह असतं.
बाजरीच्या भाकरीमध्ये प्रोटीन्स आणि फायबर दोन्हीही भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखं वाटतं.
नाचणीमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं. शिवाय तिचा ग्लायसेमिक इंडेक्सही कमी असतो. त्यामुळे नाचणीची भाकरी हा देखील एक चांगला पर्याय आहे.
राजगिऱ्यामध्ये प्रोटीन्स भरपूर असतात. त्यामुळे उपवासाला तरी राजगिऱ्याची भाकरी किंवा थालिपीठ खाण्यास प्राधान्य द्यायला हवं.
भरपूर फायबर असल्यामुळे मक्याची रोटीसुद्धा वेटलॉस करणाऱ्या मंडळींसाठी फायदेशीर ठरते.