मऊ मऊ खिचडी साजूक तूप! पाहा खिचडीचे ५ प्रकार

खिचडी फक्त एकाच प्रकारे नाही विविध प्रकारे करता येते. तुम्ही कशी करता ?

खिचडी हा पदार्थ घरोघरी केला जातो. खिचडी झटपट होते, पौष्टिक असते. मुळात हवी तशी करता येते. काही बंधन नाही. एखादा पदार्थ नाही घातला तर चव बिघडत नाही.

खिचडीतही प्रकार असतात. साधी परतून केलेली खिचडी तर आहेच, मात्र इतरही काही प्रकार आहेत. 

पालक खिचडी हा पदार्थ फारच चविष्ट असतो. करायला एकदम सोपा आहे. वरतून छान फोडणी द्यायची. 

सुकी मसाला खिचडी केली जाते. भाज्या मसाले घालून छान चमचमीत करायची. 

उपासाला केली जाणारी साबुदाणा खिचडी तर आपल्या सगळ्यांच्याच आवडीची आहे. 

दलिया हा ही खिचडीचाच एक प्रकार. वजन कमी करण्यासाठी खाल्ला जाणारा हा पदार्थ चवीला छान आणि पोटाला बरा. 

जसा मऊ भात केला जातो. तसाच मऊ खिचडी हा प्रकारही केला जातो. पोटाला आराम मिळतो. तुपाची धार सोडायची, आहाहाहा!!

Click Here