कमी वयात केस पांढरे होऊ द्यायचे नसतील तर काही पदार्थ नियमितपणे खायलाच हवेत..
या पदार्थांमध्ये असणारे काही घटक केसांसाठी अतिशय फायदेशीर ठरतात. त्यामुळे केस काळे राहण्यास मदत होते. ते पदार्थ कोणते ते पाहा..
काळ्या तिळांमध्ये असणारं कॉपर शरीरात मेलॅनिन वाढविण्यासाठी मदत करतं. त्यामुळे दररोज १ चमचा काळे तीळ खायलाच हवेत.
आवळ्यामध्ये असणारे ॲण्टीऑक्सिडंट्स केस काळे राहण्यास मदत करते.
पालकामध्ये लोह, फोलेट जास्त प्रमाणात असतं. ते केसांसाठी अतिशय फायदेशीर असल्याने केस काळे राहण्यास मदत होते.
केस पांढरे होऊ नयेत म्हणून अक्रोडही नियमितपणे खा. कारण त्यात असणारे ॲण्टीऑक्सिडंट्स केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात.