हिमोग्लोबिन झटपट वाढविण्यासाठी मदत करणारे ५ पदार्थ

ज्या लोकांचं हिमोग्लोबिन नेहमीच कमी असतं त्यांनी पुढे सांगितलेले काही पदार्थ नियमितपणे खायला हवे.

कारण हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे सतत थकवा, आळस येतो. उत्साह कमी होतो आणि आजारपणं वाढायला लागतात.

त्यामुळेच पुढे सांगितलेले काही पदार्थ रोज खा. काही दिवसांतच हिमोग्लोबिन चांगलं वाढेल.

सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे पालक. पालकाचं सूप, भाजी, पराठे नेहमी खा. त्यातून भरपूर लोह मिळतं.

बीटरुट हा देखील लोह मिळविण्याचा एक चांगला स्त्रोत आहे. त्यामुळे ते आपल्या आहारात नेहमी हवंच.

डाळिंबामधून व्हिटॅमिन सी आणि लोह दोन्हीही चांगल्या प्रमाणात मिळतं. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

खजूर, बेदाणे आणि अंजीर या पदार्थांमधूनही लोह मिळतं.

नियमितपणे गूळ खाल्ल्यानेही हिमोग्लोबिन वाढतं. त्यामुळे गूळ शेंगदाणे, गूळ फुटाणे असं नेहमीच खायला हवं. 

Click Here