तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता आहे हे सांगणारी ५ लक्षणं 

आपण रोज जेवढं पाणी पितो तेवढं आपल्या शरीराला पुरेसं ठरतं नाही हे सांगणारी काही लक्षणं..

ही लक्षणं वेळीच ओळखायला हवी आणि पाणी पिण्याचं प्रमाण वाढवायला हवं. 

नेहमीच गळून गेल्यासारखं वाटणं, खूप थकवा येणं.

तोंड काेरडं पडून तोंडातून वारंवार दुर्गंधी येत असेल तर पाणी पिण्याचं प्रमाण वाढवायला हवं.

पाणी कमी प्यायल्याने शरीरातलं ऑक्सिजन आणि ग्लुकोजही कमी होतं. त्यामुळे चिडचिड व्हायला लागते.

त्वचा कोरडी आणि रुक्ष होणे हे देखील पाणी कमी पिण्याचं एक लक्षण आहे.

पाणी कमी प्यायल्याने सोडियम आणि पोटॅशियमही कमी होऊ शकतं. त्यामुळे पोटऱ्यांमध्ये गोळा येण्याचा त्रास होतो.

पाणी कमी पिणाऱ्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रासही होतो. 

Click Here