घोरण्याची सवय कमी करण्याचे ५ उपाय 

तुम्हालाही घोरण्याची सवय असेल तर हे काही उपाय करून पाहा. 

पाठीवर झोपणे टाळा. डाव्या किंवा उजव्या अंगावर झोपा. यामुळे घोरणे कमी होते. 

झोपताना थोडी मोठी उशी वापरा जेणेकरून डोके शरीरापेक्षा थोडे वर राहील.. यामुळेही घोरण्याचा त्रास कमी होऊ शकतो.

वजन जास्त असणारे लोकं घोरतात असं लक्षात येतं. त्यामुळे वजन आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करा.

नाक आणि घसा कोरडे असतील तर घोरण्याचा त्रास वाढतो. यासाठी झोपण्यापुर्वी बोटाला थोडेसे साजूक तूप लावून ते नाकात घाला.

भ्रामरी प्राणायाम, ओमकार, गाणे गुणगुणने असे काही घशाच्या संबंधित व्यायाम केल्यानेही घोरण्याचा त्रास कमी होतो..

Click Here