वजन कमी करायचं असेल तर नाश्त्यामध्ये काही प्रोटीनयुक्त पदार्थ खा. वजन कमी करण्यासाठी निश्चितच मदत होईल.
वजन कमी करण्यासाठी किंवा आहे ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी या पदार्थांचा खूप उपयोग होतो.
पहिला पदार्थ म्हणजे पनीर फ्राय. पनीरमधून भरपूर प्रोटीन्स तर मिळतातच. शिवाय बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते.
पनीरला पर्याय म्हणून टोफू फ्राय खाण्याचा विचारही तुम्ही नक्कीच करू शकता.
सोया चंक्स कित्येक वेगवेगळे मसाले आणि भाज्या घालून फ्राय करता येतात. प्रत्येक पदार्थासोबत त्याची चव खुलत जाते.
भरपूर भाज्या घ्या. तुम्हाला पाहिजे ते मसाले घालून त्या तुपामध्ये फ्राय करा. मस्त पदार्थ तयार होईल.
बेसनाचं धिरडं हा देखील एक खूप पौष्टिक पदार्थ आहे. बेसनाचं धिरडं करताना त्यात भाज्या किसून घाला. चव आणि पोषण दोन्हीही वाढेल.