बटाट्याच्या अशा रेसिपी ज्या सगळ्यांनाच फार आवडतील. घरी नक्की करुन पाहा.
बटाटा शक्यतो सगळ्यांनाच आवडतो. बटाट्याचे विविध पदार्थ जे बाहेर फार महाग विकले जातात. ते घरी करायला अगदी सोपे आहेत.
पाहा असे ५ पदार्थ जे खाताना लहान मुलांना तर फार आनंद होतोच शिवाय मोठेही फार आवडीने खातात.
फ्रेंच फ्राइज हा पदार्थ केला की लहान मुलांचा उत्साह फारच जास्त असतो. कितीही खाल्ले तरी कमीच वाटतात. मीठ मसाला लावून करायचे.
बटाटा रिंग्ज हा पदार्थ आजकाल फार प्रसिद्ध आहे. रवा, बटर, मसाले, बटाटा सारे एकत्र करुन त्याच्या पोकळ गोलाकार आकाराच्या रिंग्ज तयार करायच्या. आणि तळायच्या.
आलू टिक्की तर आपला शुद्ध देसी पदार्थ आहे. जो लहानमोठेच नाही तर परदेशातही आवडीने खाल्ला जातो. घरोघरी केला जातो.
पोपॅटो-चीज बॉल्ज हा पाश्चात्य पदार्थ काही वर्षांपूर्वी भारतात फार लोकप्रिय झाला. अजूनही त्याची क्रेझ तेवढीच आहे.
आलू-कॉर्न टिक्की हा पदार्थ पौष्टिक आणि चविष्ट आहे. विविध भाज्या घालू न करु शकता. मस्त लागतो. तळण्याऐवजी मस्त परतून करा.