फुफ्फुसांना निरोगी ठेवणारी 'ही' रोपं घरात असावीच...

आसपासची हवा शुद्ध करून फुफ्फुसांना निरोगी ठेवणारी रोपं कोणती ते पाहूया..

काही काही रोपं अशी असतात जी खूप जास्त प्रमाणात ऑक्सिजन सोडतात. 

शिवाय काही रोपं अशीही असतात जी वातावरणातले दुषित वायू शोषून घेतात आणि हवा शद्ध करतात. अशी रोपं आपल्या घरात असायलाच हवी. 

त्यापैकी एक आहे स्पायडर प्लांट. हवेतले विषारी वायू हे रोप शोषून घेतं.

आजुबाजुची हवा शुद्ध ठेवून जास्तीत जास्त ऑक्सिजन देणारं एक रोप म्हणजे मनी प्लांट. 

रबर प्लांटही त्यापैकीच एक आहे. हे रोप लकी प्लांट म्हणूनही ओळखले जाते.

हवेतले दुषित घटक शोषून आजुबाजुची हवा शुद्ध करण्याचं काम पीस लीली करते. शिवाय घराच्या सौंदर्यातही पीस लीली भर टाकते.

अरेका पाम घरात शुद्ध हवा आणि पॉझिटीव्हीटी आणते. कॉर्नरपीस म्हणून घरात ठेवायलाही ते खूप आकर्षक दिसतं. 

Click Here