वातावरणातला गारवा वाढल्यामुळे त्वचा थोडी कोरडी पडायला सुरुवात झाली आहे.
वाढत्या थंडीसोबत त्वचेचा कोरडेपणा वाढू द्यायचा नसेल तर पुढील पदार्थ लावायला आतापासूनच सुरुवात करा.
मोहरीचं तेल उत्तम आहे. ते उष्ण असल्याने त्वचेमध्ये रक्ताभिसरणही चांगलं होऊन त्वचा चमकदार होण्यास मदत होते.
व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असणारं बदामाचं तेल थंडीच्या दिवसांत त्वचेला आवर्जून लावायलाच हवं.
तिळाचं तेलही त्वचेसाठी अतिशय उत्तम असून कमी वयात येणाऱ्या सुरकुत्या घालविण्यासाठीही ते उपयुक्त ठरतं.
त्वचा मॉईश्चराईज करण्याचा स्वस्तात मस्त उपाय म्हणजे खोबरेल तेल. रोज रात्री झोपण्यापुर्वी खोबरेल तेल लावून त्वचेला मालिश करा.
त्वचेचा काेरडेपणा कमी करण्यासाठी ऑलिव्ह ऑईलदेखील अतिशय उपयुक्त ठरतं.