कॅन्सरचं प्रमाण सध्या खूप वाढत चाललं आहे. त्यामागची काही मुख्यं कारणं कोणती ते पाहूया..
स्माेकिंग हे कॅन्सरसारखे आजार वाढविणारं एक घाणेरडं व्यसन आहे. यामुळे फुफ्फुस, तोंड, श्वसननलिकेचा कॅन्सर होऊ शकतो.
शारिरीक हालचाली कमी असणे, व्यायाम न करणे यामुळेही कॅन्सरचा धोका वाढतो.
अल्कोहोल जास्त प्रमाणात घेण्याची सवय असणाऱ्यांनाही लिव्हर कॅन्सरचा धोका असतो.
चुकीच्या आहारपद्धतीमुळेही कॅन्सर होतो. आहारात फळं, भाज्या जास्तीतजास्त प्रमाणात हवे.
शरीरात कोणतीही गाठ दिसली, कोणताही लहान- मोठा त्रास होत असला तरी तो अंगावर काढू नये.