५ मिनिटांत कुकरमध्ये करा कप केक 

झटपट केक करा तो ही कुकरमध्ये. चव एकदमच भारी. 

केक करायचा म्हणजे भरपूर कष्ट असतात असे जर वाटत असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठीच आहे. 

कुकरमध्ये कप किंवा मग ठेऊन मस्त मऊ केक करता येतो. रेसिपीही अगदी सोपी आहे. 

एका कपात चार चमचे मैदा घ्या. मैदा चाळून घ्यायचा. मैद्यात थोडा बेकींग सोडा आणि थोडी बेकींग पावडर घाला. 

त्यात कोको पावडर घाला आणि मिक्स करुन घ्या. चमचाभर मिल्क पावडर घालायची आणि मग आवडत्या चॉकलेटचे तुकडे घालायचे. 

त्यात चॉकलेट सिरप घाला. नाही घातले तरी हरकत नाही. त्यात दूध घाला आणि थोडी साखर घालून मग ढवळून घ्या. 

मिश्रण जास्त पातळ करु नका जरा घट्टच राहू दे. मध्यम प्रमाणात ठेवायचे. मिश्रण छान तयार झाल्यावर सेट करायचे.

एका कुकरमध्ये मीठ घ्यायचे. त्यावर उलटी ताटली ठेवा आणि ताटलीवर कप ठेवा. कुकरचं झाकण लावा आणि दोन ते तीन शिट्या काढा.

कुकर उघडल्यावर मस्त टम्म फुगलेला केक मिळेल. चवीला छान आणि करायला सोपा. तुम्हाला आवडेल त्या प्रकारचा केक करु शकता.   

Click Here