काही इनडोअर प्लांट्स असे आहेत जे आपण आपल्या बेडरूममध्ये ठेवू शकतो...
या रोपांमुळे बेडरूमचं सौंदर्य तर खुलतंच, पण आपल्या आरोग्यालाही फायदे होतात.
त्यापैकी एक आहे लव्हेंडर प्लांट. या फुलांचा येणारा हलका सुगंध ताण कमी करण्यास मदत करतो. त्यामुळे झोप चांगली येते आणि चिडचिडेपणाही कमी होतो.
गोल्डन पोथोस हे रोपही तुमच्या बेडरूममध्ये आवर्जुन ठेवा. खोलीतले विषारी पदार्थ शोषून हवा शुद्ध करण्याचं काम हे रोप करतं.
मोगऱ्याची फुलं किंवा मोगऱ्याचे रोप तुमच्या बेडरूमच्या बाल्कनीमध्ये ठेवता आलं तर जास्त छान. त्याचा सुगंध मनाला फ्रेश करून टाकतो.
कोरफडीचं रोपही बेडरूममध्ये ठेवावं असं म्हणतात. कारण हवा शुद्ध करण्यासाठी हे रोप उपयुक्त ठरतं.
वेलेरियन हे रोप जर बेडरूम मध्ये ठेवलं तर मनावरचा आणि शरीरावरचा ताण कमी होऊन शांत झोप येण्यास मदत होते.
पीस लीली हे असंच एक सुंदर रोप. ॲलर्जी निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियाला मारण्यासाठी हे रोप उपयुक्त ठरतं असं म्हणतात.