भरपूर प्रोटीन्स देणाऱ्या हरबरा डाळीचे ५ पौष्टिक पदार्थ

नाश्त्यासाठी तुम्ही हरबरा डाळीच्या पिठाचे म्हणजेच बेसनाचे काही सोपे पदार्थ नक्कीच बनवू शकता.

हरबरा डाळीमध्ये प्रोटीन्स, फायबर चांगल्या प्रमाणात असतात. तसेच कॅलरी कमी असतात. त्यामुळे वेटलॉससाठीही मदत होतेच.

बटाटा, वेगवेगळ्या भाज्या घालून तुम्ही बेसनाच्या अशा टिक्की करू शकता. दही, सॉससोबत त्या चांगल्या लागतील.

काही भाज्या घालून केलेले हरबरा डाळीचे पौष्टिक सूपही अतिशय चवदार लागते.

बेसन आणि रवा एकत्र करून त्यांच्यापासून सुपरसॉफ्ट इडली तयार करता येतात. नाश्त्यासाठी तो एक चांगला पदार्थ ठरू शकतो.

बेसनाचे पराठे किंवा धपाटेही छान होतात. त्यात तुम्ही वेगवेगळ्या भाज्याही किसून घालू शकता.

ढोकळा हा तर कित्येकांचा अतिशय आवडीचा पदार्थ आहे. गरमागरम ढोकळा चांगल्या प्रमाणात प्रोटीन्स देतो. 

Click Here