वेटलॉस करणाऱ्या लोकांना सायंकाळची छोटीशी भूक भागविण्यासाठी काय खावं याचं खूप टेन्शन असतं..
कारण त्यावेळी जर एखादा चुकीचा पदार्थ खाल्ला तर लगेच वजन वाढू शकतं. म्हणूनच पुढे सांगितलेले काही पदार्थ खा..
पहिला पदार्थ आहे फुटाणे. फुटाण्यांमुळे वजन वाढण्याची भीती नाही. त्यासोबत थोडा गूळ खाल्ला तर हिमोग्लोबिनही वाढेल.
संध्याकाळी स्नॅक्स म्हणून तुम्ही भाजलेली मुगाची डाळ सुद्धा खाऊ शकता.
मुगाच्या डाळीप्रमाणेच भाजलेले मूग हा देखील एक चांगगला पर्याय आहे.
भोपळ्याच्या बिया, सुर्यफुलाच्या बिया यांच्यासोबतच काही सुकामेवा खाल्ला तर त्यातून प्रोटीन्स आणि हेल्दी फॅट्स मिळतात.
मखाना भेळ किंवा तुपामध्ये भाजलेले मखाना असं काही देखील उत्तम स्नॅक्स आहे. त्यातून खूप कमी कॅलरी मिळतात.