काही ब्यूटी प्रोडक्ट्स आपल्याला चांगले वाटत असले तरी ते स्किन स्पेशलिस्टच्या मते आपल्या सौंदर्यासाठी घातक आहेत...
त्यापैकी एक आहे लुफा. तो नेहमी ओलसर असतो आणि बाथरुमसारख्या दमट, कोंदट जागी ठेवला जातो. त्यामुळे त्याच्यावर खूप फंगस आणि बॅक्टेरिया असतात. जे त्वचेसाठी अजिबात चांगले नाही.
ॲण्टी हेअरफॉल शाम्पू वापरून केस गळणं थांबत नाही. त्यामुळे असे शाम्पू वापरणंही वेस्ट ऑफ टाईम ॲण्ड मनी आहे, असं कित्येकांचं मत आहे.
मेकअप काढण्यासाठी मेकअप वाईप्स अनेकजणी वापरतात. पण त्यांच्यातले केमिकल्स त्वचेसाठी चांगले नाहीत. त्याऐवजी खोबरेल तेल, बदाम तेल वापरू शकता.
ब्लॅकहेड्स काढण्यासाठी विकत मिळणाऱ्या स्ट्र्रिप्स वारंवार वापरल्याने तिथली त्वचा नाजूक होत जाते. त्यामुळे त्यांचा अतिरेक टाळायला हवा.
प्लास्टिकचा कंगवा वापरणेही अनेकजण टाळतात. त्याऐवजी केसांसाठी लाकडी कंगवा अधिक चांगला असतो, असं मानलं जातं.