हिमाेग्लोबिन झटपट वाढवून भरपूर एनर्जी देणारे ५ पदार्थ
ज्यांचं हिमोग्लोबिन नेहमीच कमी असतं अशा लोकांनी काही पदार्थ नियमितपणे खायलाच हवेत..
त्यापैकीच एक आहे डाळिंब. त्यातून लोह आणि व्हिटॅमिन सी दोन्हीही भरपूर प्रमाणात मिळतं. त्यामुळे ते विशेष पौष्टिक असतं.
लोह किंवा हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी नियमितपणे खजूर खाणंही खूप फायदेशीर ठरतं.
बेदाण्यांमध्ये लोह चांगल्या प्रमाणात असतं. त्याचा पुरेपूर लाभ शरीराला हाेण्यासाठी व्हिटॅमिन सी देणाऱ्या एखाद्या फळासोबत बेदाणे खाणं जास्त फायदेशीर ठरतं.
लोह, व्हिटॅमिन सी आणि ॲण्टीऑक्सिडंट्स हे सगळंच भरपूर प्रमाणात पाहिजे असेल तर थंडीच्या या दिवसांत आवळे खाणं खूप चांगलं.
अंजीरामध्येही चांगल्या प्रमाणात लोह असतं. तुम्ही सुकलेलं अंजीर खाल्लं तरी त्याचाही हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी फायदा होतो.