ॲसिडीटीचा त्रास असणाऱ्यांनी टाळायलाच हवेत 'हे' पदार्थ

काही लोकांना ॲसिडीटीचा खूप त्रास असतो. अशा लोकांनी काही पदार्थ खाणं टाळलेलंच बरं...

त्यापैकी एक आहे तळलेले मसालेदार पदार्थ. या पदार्थांमुळे ॲसिडीटी लगेच वाढते. 

दुसरं आहे पिझ्झा, बर्गर असे फास्ट फूड, जंक फूडचे वेगवेगळे प्रकार. या पदार्थांमुळेही ॲसिडीटी खूप वाढते.

वारंवार चहा कॉफी पिणेही चांगले नाही. ॲसिडीटी टाळण्यासाठी या पेयांचा अतिरेक टाळायलाच हवा.

गोड पदार्थ खूप खात असाल किंवा रिफाईंड शुगर असणाऱ्या मिठाई, चॉकलेट्स जास्त प्रमाणात खाल्ल्यानेही ॲसिडीटी वाढते.

ॲसिडीटीचा त्रास असणाऱ्या लोकांनी आहारातले फायबरचे प्रमाण वाढवायला हवे. 

Click Here