हल्ली रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशरचा त्रास अनेकांना खूपच कमी वयात सुरू झालेला आहे.
तो त्रास नियंत्रणात ठेवायचा असेल तर काही व्यायाम नियमितपणे करणं खूप गरजेचं आहे. ते व्यायाम नेमके कोणते ते पाहूया..
पहिला व्यायाम म्हणजे स्विमिंग. काही अभ्यासानुसार असं समोर आलं आहे की नियमितपणे स्विमिंग केल्यास systolic and diastolic ब्लड प्रेशर नियंत्रित राहाते.
शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होण्यासाठी सायकलिंग करणेही फायद्याचे ठरते.
डान्स आवडत असेल तर जरुर झुंबा करा. त्यामुळे रक्तदाब तर नियंत्रित राहातोच, पण फॅट आणि कॅलरी कमी होण्यासही मदत होते.
नियमितपणे योगाभ्यास केल्यानेही ब्लड प्रेशर नियंत्रणात राहाते.
जीममध्ये जाऊन तज्ज्ञ ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली विविध व्यायाम केल्यानेही रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होऊ शकते.