फिटनेस टिकवून ठेवायचा असेल तर नियमितपणे काही व्यायाम करायला हवे.
पण व्यायाम करताना ते आपल्यासाठी योग्य आहेत ना, त्यामुळे आपलं दुखणं वाढणार तर नाही ना याचा सल्ला तज्ज्ञांकडून घ्यायला हवा.
उदाहरणार्थ ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी पळण्याचा व्यायाम करणे टाळावे.
दोरीवरच्या उड्या मारण्याचा व्यायामही प्रत्येकालाच मानवेल असे नाही. त्यामुळे जॉईंट पेन वाढू शकते.
पायाचा घोटा, गुडघेदुखी असा त्रास असणाऱ्यांनी जंपिंग जॅक किंवा उड्या मारण्याचा व्यायाम करू नये.
अशा पद्धतीने गुडघा दुमडल्यास त्यावर प्रचंड ताण येऊन तो जास्त दुखू शकतो.
गुडघे दुखणाऱ्यांनी डिप स्क्वॅट करू नये. त्यामुळे गुडघ्यांवर विनाकारण जास्त ताण येतो.