नाश्त्याला करा ५ चविष्ट -पौष्टिक आणि हटके पदार्थ

नाश्त्याला करा काहीतरी वेगळे. चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ करण्यासाठी रेसिपी. 

नेहमीच्या नाश्त्यापेक्षा थोडं वेगळं पण भारतीय चवीला साजेसं काहीतरी खायचं असेल तर हे पाच सोपे पर्याय नक्की करता येतील.

पहिली रेसिपी म्हणजे पालक-चीज पराठा. गव्हाच्या पिठात बारीक चिरलेला पालक, मीठ, मसाले घालून पीठ मळून घ्या. त्यात थोडंसं चीज स्टफ करून पराठा लाटून तव्यावर परता. 

व्हेजिटेबल दलिया उपमा. दलिया थोडं भाजून घ्या आणि मग त्यात कांदा, टोमॅटो, गाजर, मटार भाज्या घालून फोडणी देऊन शिजवा. हा नाश्ता हलका, पौष्टिक आणि पचायला सोपा असतो.

तिसरी रेसिपी म्हणजे बेसन टोस्ट. बेसनामध्ये पाणी घालून बॅटर तयार करा. त्यात हळद, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि कांदा घाला. ब्रेड स्लाइस या बॅटरमध्ये बुडवून तव्यावर परतून घ्या. 

कणकेचा शिरा करायला सोपा आणि चवीला मस्त असतो. त्यामुळ नक्की करुन पाहा. त्यात साखर किंवा गूळ घालू शकता. नाश्त्याला काही गोड खायचे असेल तर उत्तम. 

पाचवी रेसिपी म्हणजे रवा ढोकळा. रवा, दही आणि थोडं पाणी घालून बॅटर तयार करा. त्यात इनो किंवा खायचा सोडा घालून वाफवून घ्या. वरुन मोहरी, कडीपत्ता, हिरवी मिरची यांची फोडणी देऊन सर्व्ह करा. 

Click Here