खोबरेल तेलाचा वापर फक्त केसांसाठीच करत असाल तर थोडं थांबा आणि त्याचे हे काही अफलातून उपयोग पाहा..
खोबरेल तेल आणि हळद यांच्या मिश्रणाने दात घासा. दात मोत्यासारखे चमकतील. दात ठणकणंही कमी होईल.
खोबरेल तेल आणि कांद्याचा रस एकत्र करून डोक्याला मालिश करा. केस गळणं कमी होऊन चांगले वाढतील.
गुडघे, पायाचे घोटे, हाताचे कोपरे काळवंडले असतील तर ते स्वच्छ करण्यासाठी खोबरेल तेल आणि बेकिंग सोडा एकत्र करून लावा.
खोबरेल तेल आणि कॉफी पावडर एकत्र करून डोळ्यांभोवती लावा. डार्क सर्कल्स काही दिवसांतच कमी होतील.
साखर आणि खोबरेल तेल यांच्या मिश्रणाने त्वचेला मालिशय करा. ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स कमी होतील.