व्यायाम करण्यासाठी खूप वेळ मिळत नसेल तर किमान १० ते १५ मिनिटे तरी स्वत:साठी काढायलाच हवीत.
सकाळच्या फ्रेश हवेत नियमितपणे योगा केल्यास शरीराला कित्येक फायदे होतात.
योगा केल्यामुळे मानसिक आरोग्य सुधारण्यासही मदत होते. मनावरचा ताण कमी होतो.
शरीराची लवचिकता वाढण्यासाठी नियमितपणे योगाभ्यास करणे अतिशय उपयुक्त ठरते.
सकाळी उठल्यावर अनेकांना अंग आखडल्यासरखे वाटते. पण योगा केल्यामुळे स्नायू मोकळे होतात. रिलॅक्स वाटते.
सकाळी व्यायाम केल्यामुळे दिवसाची सुरुवात एनर्जेटिक होते आणि हा उत्साह दिवसभर टिकतो..