कचरा समजून तुम्हीही खरबुजाच्या बिया टाकून देत असाल तर त्यांचे हे फायदे एकदा वाचायलाच हवेत.
खरबुजाच्या बियांमध्ये प्रोटीन्स, लोह, हेल्दी फॅट्स, मॅग्नेशियम, झिंक भरपूर प्रमाणात असतं.
उन्हाळ्यात शरीर डिहायड्रेट होऊ नये यासाठीही खरबुजाच्या बिया खूप उपयुक्त ठरतात. त्याचा ज्यूस करूनही काही ठिकाणी प्यायलं जातं.
खरबुजाच्या बियांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे अपचन, गॅसेस, ॲसिडीटी असे त्रास कमी करण्यासाठी या बिया उपयुक्त ठरतात.
खरबुजाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन्स, ॲण्टीऑक्सिडंट्स आणि खनिजेही भरपूर प्रमाणात असतात.
त्यामुळे या बिया कचऱ्याच फेकू नका. त्या धुवून स्वच्छ करा. वाळवून घ्या आणि खायला सुरुवात करा.